अजित सिड्स प्रा.लि. प्रायोजित संभाजीनगर खो-खो प्रीमियर लीगची शानदार सुरवात

संभाजीनगर (प्रतिनिधी): जित सिड्स प्रा.लि. प्रायोजित व संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी अजित सिड्स प्रा.लि. व्यवस्थापकीय संचालक तथा संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष समीर मुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन केले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा, संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, सहसचिव भारती काकडे,, मोहन अहिरे यांच्या प्रमुख उपस्थिती उद्घाटन झाले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद शर्मा सूत्र संचलन दिपक सपकाळ यांनी केले. उद्घाटन प्रसंगी दोन सामने खेळवण्यात आले.
पहिला सामना
समर्थ टायगर्स वि. वि. स्पर्श डिफेण्डर यांच्यात झाला या सामन्यात समर्थ टायगर्स संघाकडून ऋतिका हाके हिने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, अस्मित गावित ह्याने ०१:३०मी. संरक्षण केले व आक्रमणात ०४ गडी बाद केले, धनश्री गोर्डे हिने ०१ मी. संरक्षण केले, दक्ष क्षीरसागर ह्याने ०२ गडी बाद केले तर स्पर्श डिफेण्डर संघाकडून अमित हळदीकर याने ०२ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०३ गडी बाद केले, मयूर जाधव याने ०२:३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ०४ गडी बाद केले, आकांक्षा क्षीरसागर हिने ०१:३० मी. संरक्षण केले, निल जावळे ह्याने आक्रमणात ०२ गडी बाद केले, आदित्य भंगाळे ह्याने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले समर्थ टायगर 22 गुण तर स्पर्श डिफेडर 21 गुण,या सामन्यात समर्थ टायगर्स हा संघ ०२ मी. राखून व १ गुणाने विजयी झाला.
दुसरा सामना
पद्मावती जायंट्स वि. वि. गोदावरी लॉयन्स यांच्यात झाला पद्मावती जायंट्स संघाकडून आकांक्षा हारकळ हिने ०२ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, प्राची कर्डिले हिने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०४ गडी बाद केले, यश मोरे ह्याने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, आर्यन सहारे ह्याने ०२ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०१ गडी बाद केला तर गोदावरी लॉयन्स संघाकडून अनिकेत मराठे ह्याने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, मोहित कान्हेरे ह्याने ०१ मी. व आक्रमणात ०२ गडी बाद केले, वेदिका गोर्डे हिने ०१ मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले, अतुल गावित ह्याने ०१:३० मी. संरक्षण केले व आक्रमणात ०२ गडी बाद केले या सामन्यात पद्मावती जायंट्स हा संघ ०२ गुणांनी विजयी झाला.पद्मावती 23 गुण तर गोदावरी लायन्स 21 गुण
स्पर्धेत श्रीपाद लोहकरे, नवनाथ राठोड, योगेश मुंगीकर, मनोज गायकवाड यांनी पंच म्हणून काम बघितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल नाईकनवरे, चेतन गायकवाड, वरद कचरे, योगेश भोगे, अंकुश गायकवाड,राजपाल निकाळजे यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.